बॅकअप काय घ्यावा

तुमची प्राधान्यता सर्वात महत्वाच्या फाइल्स तसेच पुन्हा निर्माण करण्यास कठिण असणाऱ्या फाइल्सचे बॅकअप असायला पाहिजे. उदाहरणार्थ, सर्वात जास्त महत्वाचे ते किमान महत्वाचे रँक केलेले:

तुमच्या वैयक्तिक फाइल्स

यामध्ये दस्तऐवज, स्प्रेढशीट्स, ईमेल, दिनदर्शिका भेट, वित्तीय डाटा, कुटुंबी फोटोज, किंवा इतर व्यक्तिगत फाइल्स जे अनिवार्य आहेत.

तुमच्या वैयक्तिक सेटिंग

यामध्ये रंग, पार्श्वभूमी, स्क्रीन रेजोल्युशन आणि डेस्कटॉपवरील माऊस सेटिंग्जकरिता केलेले बदल समाविष्टीत आहे. यामध्ये ॲप्लिकेशन्स प्राधान्यता, जसे कि लिब्रेऑफिस करिता सेटिंग्ज, तुमचे संगीत वादक, आणि तुमचा ईमेल प्रोग्राम समाविष्टीत आहे. ते बदलण्याजोगी आहे, परंतु निर्माणकरिता थोडा वेळ घेते.

सिस्टीम सेटिंग

अनेक वापरकर्ते इंस्टॉलेशनवेळी निर्मीत प्रणाली सेटिंग्ज बदलत नाही. काही कारणास्तव प्रणाली सेटिंग्ज पसंतीचे केल्यास, किंवा संगणकाचा सर्व्हर म्हणून वापर करत असल्यास, ह्या सेटिंग्जचे बॅकअप घ्या.

इंस्टॉल केलेले सॉफ्टवेअर

वापरण्याजोगी सॉफ्टवेअर गंभीर संगणकीय अडचणनंतर सर्वसाधारणपणे पुन्हा इंस्टॉल करून पूर्वस्थितीत आणणे शक्य आहे.

सर्वसाधारणपणे, तुम्हाला अनिवार्य फाइल्स आणि विना बॅकअप जास्त वेळ घेणाऱ्या फाइल्स्ला बॅकअप करायला आवडेल. बाबी अदलाबदल करण्यास सोपे असल्यास, दुसऱ्या बाजूला, त्यांचे बॅकअप ठेवून तुम्हाला डिस्क जागेचा वापर करायची आवश्यकता नाही.